पाणिव येथील श्रीराम कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत तुषार दादासाहेब सरडे हे चिखलठाण व परिससरातील शेतकऱ्यांना थेट बांधावर जावुन आधुनिक शेती बाबत मार्गदर्शन करत आहेत पाणीव येथील श्रीराम कृषी महाविद्यालय यांच्याकडून ग्रामीण जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम या कार्यक्रमा मार्फत करण्यात येते. यादरम्यान चिकखठाण येथील शेतकऱ्यांना मृदा परिक्षणासाठी माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
वर्षानवर्षे पीक लागवडीमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे त्यासाठी मातीमध्ये कोणती मूलद्रव्ये कमी आहेत तसेच कोणते घातक घटक आहेत याची माहिती माती परिक्षणामुळे मिळू शकते व त्यानुसार आपण मातीमध्ये योग्य ती मूलद्रव्ये मिसळू शकतो. जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरण्याचा सल्ला त्यांनी याठिकाणी दिला. याप्रसंगी त्यांनी मृदा परिक्षणासाठी माती नमुना शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
शेतकऱ्यांतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे
यासाठी श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हाके सर कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी प्रा.धिरज दोरकर व मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका घोगरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले या उपक्रमांना शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाचे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व सचिव श्रीलेखा पाटील यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.