loader
Breaking News
Breaking News
Foto

सिना कोळगावच्या अतिरिक्त पाण्याने गौंडरे तलाव भरुन द्या -जय हनुमान सेवा भावी संस्थेची मागणी.

सिना कोळगाव धरणातील अतिरिक्त पाण्याने गौंडरे येथील पाझर तलाव भरुन द्यावा आशी म्हत्व पुर्ण मागणी गौंडरे येथील जय हनुमान सेवा भावी संस्थेच्या वतीने सिना कोळेगाव प्रकल्पा चे कार्यकारी अभियंता यांच्या कडेे लेखी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

परांडा तालुक्यासह करमाळा तालुक्यातील पुर्वभागास वरदायनी ठरलेले सिना कोळगाव धरण गेल्या तिन वर्षात पहिल्यांदच भरले आहे. आज अखेर या धरणाची पाणी पातळी शंभर टक्क्या जवळ पोहचली असुन अजुनगी मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने पाणी खाली सोडण्याच्या हालचाली सुरु आहेत

या तलावात पाणी आल्यास गौंडरे येथील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

आवाटी प्रतीनीधी /सुनिल तरटे

सिना कोळेगाव धरण ओव्हर फ्लो च्या जवळ आले असले तरी धरण परिसरातील गौंडरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, आवाटी, हिसरे या परिसरात अद्यापही मोठा पाऊस नसल्याने पाणी साठा झाला नाही. सध्या नेरले तलावात पाणी सोडण्यासाठी हलचाली सुरु आहेत. गौंडरे तलावत येणाऱ्या चारीस भराव घालुन नेरले तलावात पाणी नेले जाणार असल्याची चर्चा असल्याने आगोदर गौंडरे तलाव भरावा व मगच नेरले तलावात पाणी न्ह्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बिचीतकर सचिव अक्षय हनपुडे यांच्या सह गौंडरे चे सरपंच सुभाष नाना हनपुडे यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts