राज्यभरातील मंदिरे उघडण्या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहले होते या पत्रा मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारले होते की मंदिरे न उघडण्याबाबत तुम्हाला काय दैवादेश झाला आहे का? कींवा तुम्ही आचानक सेक्युलर झाला आहात का? या शब्दाचा तर तुम्हाला तिरस्कार होता. राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदुत्वाच्या नावाने ठाकरे यांना डिवचल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी खास शैलीत पत्र लिहुन राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे.
मंदिर प्रश्नावरु पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे व राज्यपाल कोश्यारी आमने सामने आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नेमके काय उत्तर दिले आहे सविस्तर पाहुया. (पत्राचा मजकुर जसा च्या तसा)
महोदय आपले दिनांक १२/१०/२०२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोवत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात -माझे कुटूंब, माझी जबाबदारी - हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्याचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned 'Secular' yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा -Secularism आहे तो आपल्याला मान्य नाही का?
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.