सातारा जिल्हयातील कोरेगाव मतदार संघातील शिवसेनेचे तरुण आमदार महेश संभाजी शिंदे यांनी कोरोना काळात जनतेच्या हितासाठी असे काही कार्य केले आहे की संपुर्ण मतदार संघासह संपूर्ण राज्यात या आमदाराचे कौतुक होत आहे. या आमदाराचे कार्य वाचल्यानंतर आपला आमदार कुठे आहे? असा तुम्हाला नक्की प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
महेश शिंदे हे आगोदर भाजपाचे काम करत होते मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकित हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आला मात्र राष्ट्रवादी चे तगडे नेते माजी मंत्री शशीकांत शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी तुल्यबळ नेता नसल्याने शिवसेनेे महेश संभाजी शिंदे यांना भाजापतुन आयात केले होते. तगडा जनसंपर्क, तरुणांची फौज व त्यावेळी सेना -भाजप व महायुतीची मिळालेली साथ या मुळे महेश शिंदे यांनी शशीकांत शिंदे यांचा ६२३२ मतांनी धक्कादायक पराभव करुन "जायंट किलर" ठरले होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवसेने सोबतच राहण्याचा निश्चय करुन कामाला सुरवात केली असुन कोरोनाच्या संकटात जनतेच्या हिता साठी स्वत:च्या खर्चाने कोविड सेंटर (रुग्णालय )सुरु केले आहे
कोरोना रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघातील आमदारांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण यामध्ये कोरेगावचे शिवसेना आमदार महेश संभाजी शिंदे मात्र, एकपाऊल पुढे व सरस ठरले आहेत. त्यांनी कोरेगाव येथे स्वतःच्या खर्चातून काडसिध्देश्वर महाराज कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे जिल्हा भरातून रूग्ण उपचारासाठी येऊन बरे होत आहेत. अत्याधुनिक पध्दतीने उभारलेले हे कोविड सेंटर एखाद्या मोठ्या प्रशस्त हॉस्पिटलसारखे वाटते. आमदार महेश शिंदे स्वतः २४ तास या कोरोना सेंटरमध्ये उपस्थित राहून कोरोना रूग्णांवर होणाऱ्या उपचाराची माहिती घेतात. त्यामुळे रूग्णांनाही घरातल्या माणसासारखी सेवा मिळत असल्याने दिलासा मिळत आहे. मध्यंतरी कोरोना रूग्णांना बेडच मिळत नव्हते. ही बाब महेश शिंदे यांच्या मनाला सातत्याने सतावत होती. त्यामुळे पदरमोड करून स्वतः कोरोना केअर सेंटर उभे केले आहे. या कोरोना सेंटरमध्ये सातारा व कोरेगाव तालुक्यातील रूग्णांना मोफत वैद्यकिय सेवा उपलब्ध करून दिली आहे. श्री काडसिध्देश्वर कोविड सेंटरची उभारणी केली. या कोविड सेंटरमध्ये शंभर बेडची व्यवस्था असून ऑक्सिजन बेडसह व्हेंटीलेटर व मिनी आयसीयु सुविधाही उपलब्ध केली आहे. आतापर्यंत या कोविड सेंटरमध्ये दोनशेपेक्षा जास्त रूग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. तसेच तज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास उपलब्ध केलेली आहे. गंभीर रूग्णांना रेमडिसिव्हरची इंजेक्शनसह सर्व प्रकारची वैद्यकिय सेवा, रोजचे जेवण, चहा, नाष्टा मोफत पुरविला जातो. तसेच दर्जेदार वैद्यकिय सेवा देण्यासाठी येथील वैद्यकिय स्टाफ झटताना दिसत आहे. दररोज सकाळी रूग्णांना दूध, अंडी, चहा, पोहे, त्यानंतर दुपारचे जेवण, दुपारी चार वाजता एक फळ आणि सायंकाळी सात वाजता मुगाची खिचडी, वरणभात, भाजी असे जेवण दिले जाते. यासोबतच रूग्णांना झोपण्यापूर्वी हळद टाकून दूध दिले जाते. उच्च दर्जाची वैद्यकिय सेवाआणि पौष्टिक अन्न यामुळे येथे आलेले रूग्ण वेळेत बरे होतात . अगदी घरच्यासारखे वातावरण या कोविड सेंटरमध्ये पहायला मिळते. आमदार महेश शिंदे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. पण त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात करून जनतेच्या सेवेस वाहून घेतले आहे. तसेच डॉ. विजया चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स व नर्सेस यांची टीम २४ तास कार्यरत आहे. कोणत्याही शासकिय मदतीची वाट न पाहता स्वतः पदरमोड करून त्यांनी हे कोविड सेंटर सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघातील जनतेला कोरोनावर यशस्वीपणे मात करता आली पाहिजे,हा त्यांचा अट्टाहास आहे. या तळमळीतूनच त्यांनी कोरोना संकटाच्या काळात उभारलेले हे कोविड सेंटर रूग्णांना वरदान ठरले आहे. नुसते कोविड सेंटर उभारले म्हणजे झाले असे सर्वत्र पहायला मिळते. पण कोरेगावातील कोविड सेंटरमध्ये स्वतः आमदार महेश शिंदे २४ तास उपस्थित राहून रूग्णांना वेळेत उपचार मिळतात का, डॉक्टर वेळेतवर येतात का, प्रत्येकाची तब्येत कशी आहे, त्याना आहार वेळेवर व पुरेसा मिळतो का. काळजी करू नका तुम्हाला मी काहीही कमी पडून देणार नाही, असा दिलासा देत असतात. यासोबतच महेश शिंदे यांची बहिण डॉ. अरूणा बर्गे या ही सकाळी आठ वाजल्यापासून रात्री अडीच वाजेपर्यंत स्वतः या सेंटरमध्ये उपस्थित राहून रूग्णांची सेवा करतात.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.