loader
Breaking News
Breaking News
Foto

महिलेच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडुन खोडसाळ पोस्ट केल्याने पांडे गावात खळबळ! चौकशीची मागणी

महिलेच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडुन गावातीलच महिला मुलिंचे फोटो अपलोड करुन त्यावर अश्लील कॅप्शन जोडण्यात आल्याने करमाळा तालुक्यातील पांडे गावात एकच खळबळ उडाली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदरचा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीने महिलेच्या नावाने फेसबुक खाते बनवले असुन गावातीलच सोशेल मिडिया वापरत असलेल्या मुलिंचे फोटो उपल्बध करुन या बनावट फेसबुक वर अपलोड केले आहेत व त्याला अश्लील कॅप्शन दिले आहेत . काही वेळातच या फोटोवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सदरच्या बनावट फेसबुक खात्याची लिंक व तक्रारी अर्ज पोलिस स्टेशन ला दिला गेला असुन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

विशेष प्रतिनिधि सा करमाळा चौफेर

मुलींबोरबरच गावातील महिलांचे देखील फोटो अपलोड करुन बदनामी कारक मजकुरासह ते फेसबुकवर अपलोड केल्याने पांडे गावात घबराटीचे व तणावाचे वातावरण आहे. सदर प्रकार घडल्यानंतर अनेक महिला व मुलींनी अपले पुर्वीचे अपलोड केलेले फोटो डिलीट केले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

खोडसाळपाणा करणारी व्यक्ती गावातीलच असल्यांचा ग्रामस्थांचा संशय असुन संबधित व्यक्ति कुभावनेने बदनामी करत आहे. त्यामुळे महिला व मुलींच्या फेसबुक आय डी वरून फोटो व अश्लील वक्तव्य लिहीणाऱ्या व्यक्ती ची सायबर कायदा अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करमाळा पोलिस स्टेशन येथे निवेदना द्वारे महिला व ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts