loader
Breaking News
Breaking News
Foto

अनुभवी उमेदवारांना तात्‍काळ एअर इंडिया आस्‍थापनेत समाविष्‍ट करून घ्‍या- अन्यथा सेना स्टाईल आंदोलन- खा. गजानन किर्तीकर

अनुभवी उमेदवारांना तात्‍काळ एअर इंडिया आस्‍थापनेत समाविष्‍ट करून घ्‍यावे आशा मागणीचे निवेदन शिवसेना नेते खा. गजानन किर्तीकर व खा.आरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय हवाई मंत्री श्री. हरदीपसिंग पूरी यांना देण्यात आले. या निवेदनावर सर्व सेना खासदारांच्या सह्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या निवेदनात म्हटले आहे की एअर इंडिया आस्‍थापनेत ऑगस्‍ट २०१९ मध्‍ये केबीन क्रू (पर्सर व एअर होस्‍टेस) यांची भरती प्रक्रिया करण्‍यात आली, त्‍यांचे हैद्राबाद येथे प्रशिक्षण होऊन वैद्यकीय तपासणी देखील करण्‍यात आली. सर्व उमेदवार अनुभवी आहेत. जेट एअरवेज, गो–एअर, इंडिगो यासारख्‍या नामांकीत विमान कंपन्‍यांमध्‍ये त्‍यांनी नोकरी केलेली आहे. मात्र अचानक एअर इंडिया व्‍यवस्‍थापनाने फक्‍त मुंबईमध्‍ये भरती प्रक्रिया स्‍थगित केली. याबाबत मी अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात (फेब्रुवारी २०२०) संसदेत सदर मुद्दा उपस्थित केला होता. केंद्रीय हवाई मंत्री यांनी उत्‍तरादाखल या सर्व उमेदवारांना सेवेत समाविष्‍ट केले जाईल असे आश्‍वासन दिले होते. आजमितीस एअर इंडिया कोरोना नंतर आपल्‍या हवाई सेवेचे विस्‍तारीकरण करीत आहे म्‍हणून आज निवेदन देऊन या अनुभवी उमेदवारांना तात्‍काळ एअर इंडिया आस्‍थापनेत समाविष्‍ट करून घ्‍यावे आशी मागणी केली असुन

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

याबाबत सकारात्‍मक भुमिका न घेतल्‍यास शिवसेना पध्‍दतीने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. खा. गजानन किर्तीकर यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवेदनाची केंद्रीय हवाई मंत्री यांनी दखल घेतली असुन पुढील पाच महिन्‍यांत या सर्वांना सेवेत समाविष्‍ट केले जाईल असे आश्‍वासन दिले. यावेळेस एअर इंडियाच्‍या संचालिका (एच.आर.) श्रीमती अम्रिता शरण उपस्थित होत्‍या. 

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts