loader
Breaking News
Breaking News
Foto

आज पर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी 'धनगड' या अस्तित्वहीन जमाती ला पुढे करून सत्तर वर्ष धनगर समाजावर अन्याय केला. आता माघार नाही -प्रा शिवाजीराव बंडगर

भारतीय राज्य घटने मध्ये अनुसूचित जमाती च्या आरक्षणात कलम ३४२ मध्ये स्पष्ट तरतूद केली असताना आज पर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी 'धनगड' या अस्तित्वहीन जमाती ला पुढे करून सत्तर वर्ष धनगर समाजावर अन्याय केला आहे परंतु आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मघार नाही आसा ईशारा धनगर आरक्षण कृती समिती सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिति चे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आज शेकडो धनगर बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात धनगर आरक्षण आमलबंजावणीच्या मागणी साठी तहसिलदार समीर माने यांना निवेदन दिले या वेळी प्रा. बंडगर बोलत होते. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आल्या आहेत.

या वेळी बहुसंख्य धनगर बांधव उपस्थित होते

शंभुराजे फरतडे -

या वेळी ंचायत समिती चे माजी सदस्य विलास पाटील, आदिनाथ चे माजी संचालक धुळा भाऊ कोकरे ,विठ्ठल शिंदे, डाॅक्टर अशोक शेळके ,प्रकाश कोळेकर, बाळासाहेब टकले,रासप चे तालुका ध्यक्ष अंगद देवकते, सरपंच दादा कोकरे, संदीप मारकड,भिवाजी शेजाळ, सतीश मोटे ,विक्रांत शिंदे, हिरा चौगुले, अशोक घरबुडे, महादेव पोरे,चंद्रकांत शिंदे, चंद्रशेखर पाटील, मल्हारी मारकड, अंकुश शिंदे, अरूण शेळके, संतोष कोपनर, बबन शिंदे, धनंजय शिंदे, तानाजी भोंगे,सुरेश शिंदे, राहुल पाटोळे, रावसाहेब शिंदे, किरण बोरकर,राहुल गडदे,भैरवनाथ बंडगर आदी सह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदर निवेदनात धनगर आरक्षणा आमलबजावणी बरोबर जलदगती न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेची सुनावणी सुरू करावी,मागील सरकारने जाहीर केलेल्या अनुसूचित जमाती च्या सवलती लागू करून एक हजार कोटी रूपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून ध्यावा ,मेंढपाळांवर होत असेलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा बनवावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts