loader
Breaking News
Breaking News
Foto

हिवरवाडी ते करमाळा रस्ता तात्काळ दुरुस्त करा -जितेश कांबळे

करमाळा ते हिवरवाडी व भोसे गावाला जोणडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असुन तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तिव्र आंदोलन करु असा इशारा .रिपाई आठवले गट युवक आघाडी चे तालुका अध्यक्ष जितेश कांबळे यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा येथुन हिवरवाडी भोसे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या शेकडो खड्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावरुन धोकादायक प्रवास सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासुन रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे.त्या मुळे नागरींकाची गैरसोय होत आहे.

तालुका प्रतीनिधी /सा करमाळा चौफेर

सध्या खरिप हंगाम चांगला झाल्याने शेतकऱ्यांचा माल विक्री साठी करमाळा बाजार समिती मध्ये येत आहे मात्र रस्त्यावर असलेल्या दोन ते तिन फुटांच्या खड्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सध्या पावसाचे दिवस असल्याने ठिकठिकाणी खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. त्या मुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हे खड्डे बुझवुन रस्ता दुरुस्त करा अन्यथा तिव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा रिपाई युवक आघाडी चे तालुका प्रमुख जितेश कांबळे यांनी दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts