loader
Breaking News
Breaking News
Foto

लाल बाग येथे सकल मराठा समाजाचे आंदोलन, पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणा विरोधात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल देवुन सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला घटनाबाह्य ठरवत स्थगिती दिली आहे. या मुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली असुन जमावबंदीचा आदेश झुगारुन आज लालबाग येथे राजा विचारे, अभिजित घाग ,राजन घाग सचिन मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अनेक महामोर्चे व अनेकांच्या बलिदाना नंतर मराठा समाजाला हे आरक्षण मिळाले होते परंतु न्यायालयात मात्र हे आरक्षण टिकु शकले नाही.

जमावबंदी झुगारुन हे आंदोलन होणार असल्याने अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर भाजप व महाविकास आघाडी यांच्या मध्ये कलगीतुरा सुरु झाला असुन मराठा समाज मात्र केंद्र व राज्य सरकार विरोधात अक्रमक झाला असुन मराठा समाजाच्या विरोधात संवैधानिक भेदभाव करु नका आशी मागणी करत संतप्त झाला असुन तात्काळ स्थगिती हटवा, स्थगिती उठे पर्यंत कोणत्याही सरकारी विभागात नोकरी भरती करु नका आशी मागणी करत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे ती तात्काळ उठवा व आम्हाला मिळालेले आरक्षण पुर्ववत करा. तसेच स्थगिती हटे पर्यंत कोणत्याही विभागाची नोकरभरती करु नका हिच आमची मागणी आहे. आमची मागणी सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी लॉकडावुन असताना सुद्धा सर्व नियम पाळुन आम्ही संयमाने निषेध व्यक्त करत आहोत मात्र आमच्या मागण्या मान्य न केल्यास मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक नक्की होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहिल असा इशारा समन्वयक राजन घाग यांनी या वेळी दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts