loader
Breaking News
Breaking News
Foto

साताऱ्याचे सुपुत्र विर जवान सचिन जाधव यांना वीरमरण, साश्रुनयनांनी निरोप.

देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं आहे. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. दुसाळे गावातील सचिन संभाजी जाधव यांना भारत-चीन सीमेवरील लेहलडाख या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद सचिन जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा दिल्लीतून पुण्याला पोहोचले तिथून सचिन यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दुसाळेला पोहोचले आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

हुतात्मा सचिन संभाजी जाधव हे १११ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कार्यरत होते.

संचित जगदाळे /सातारा प्रतिनिधी सा चौफेर

शहिद सचिन जाधव यांचे वडिल संभाजी जाधव हे सैन्यदलातुन निवृत झाले आहेत तर लहान भाऊ सध्या सिमेवर तैनात आहेत. शहिद सचिन जाधव हे एक महिन्याच्या सुट्टिवर आले होते परंतु भारत चिन सिमेवर तणाव वाढल्याने त्यांना बोलावुन घेण्यात आले होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शहीद सचिन जाधव यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रक मधुन अंत्यविधीच्या ठिकाणी आणले गेले या वेळी चौका-चौकात महिलांनी औक्षण करुन पृष्पवृष्टी केली. गावात व तालुक्यात त्यांच्या श्रद्धांजली चे पोस्टर झळकत होते. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. अंत्यविधी साठी गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts