loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रबोधनकार ठाकरे यांचा समतेचा विचार महाराष्ट्राच्या हिताचा -. डॉ रघुनाथ कुचिक

प्रबोधनकार ठाकरे यांचा समतेचा न्याय विचार महाराष्ट्रासाठी हिताचा असून, आजच्या तरुण पिढीने त्यांच्या आचरणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन वाटचाल करावी हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते, किमान वेतन सल्लागार महामंडळाचे अध्यक्ष, तथा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केले.आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन युवाशक्ती पुणे शहर तर्फे अभिवादन सभा झाली.त्या वेळी डॉ कुचिक बोलत होते.

प्रबोधन युवाशक्तीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा प्रबोधन कार्यालयात पार पडला.

चौफेर प्रतिनिधी / पुणे

समता, न्याय, बंधुता या वारकरी संप्रदायातील मानवीय मूल्यांचा जागर होणे आणि तरुणांनी जात-पात निरपेक्ष पुरोगामी विचार अंगी बाळगून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी धडपड करणे हेच प्रबोधनकार ठाकरे यांचे स्वप्न होते, असेही डॉ. कुचिक यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

याप्रसंगी सुवर्णा कुमार बोराटे यांना प्रबोधन गौरी गणपती राज्यस्तरीय सजावट महास्पर्धेतील विजेते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या गायत्री भागवत, सोनाली निकम, संदीप वाघमारे,सचिन पाटील, नीलेश लंगोटे, सुधीर चिंचोलीकर, दिलीप पल्लाकोंडा आदी उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts