loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदी निर्णय आन्याय कारक -दादासाहेब लबडे

केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीचा निर्णया विरोधात करमाळा तालुका कॉंग्रेस अक्रमक झाली असुन निर्यात बंदी निर्णय मागे घेण्यासाठी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप व तालुका अध्यक्ष दादासाहेब लबडे यांच्या नेतृत्वा खाली तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदर निवेदनात असे म्हटले आहे की जगभरात लाॅकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले असून कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यावर अन्याय केला आहे .तीन महिन्यापूर्वी म्हणजे 4 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा बटाटा ,डाळींना ,जीवनावश्यक वस्तूचे यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. आणि तीन महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होणार आहे .

तालुका प्रतीनिधी सा करमाळा चौफेर

या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे करमाळा शहराचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब पवार, माजी पंचायत समिति सदस्य विष्णु दादा पारखे आदी मान्यवर उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निर्यात बंदी निर्णय अन्यायकारक असुन कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा आहे असा आरोप कॉंग्रेस चे करमाळा तालुका अध्यक्ष दादासाहेब लबडे यांनी केला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts