कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 144 कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. दरन्यान, अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे पर्यटनमंत्री आदित्या ठाकरे यांनी ट्वीटर द्वारे मुंबईकरांना आवहान केलं आहे.
मुंबई पोलिसांच्या आदेशानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना घाबरुन न जाण्याचं आवहान केलं असुन "कलम 144 सीआरपीसी अंतर्गत जारी केलेल्या आदेशात केवळ 31 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या मागील आदेशाचा विस्तार आहे. मुंबई पोलीसांनी कोणतेही नवीन निर्बंध घातले नाहीत", असेही त्यांनी स्पष्ट आहे.
आज मध्यरात्री पासुन कलम 144लागु होणार
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय सरकारने मिशन बिगीन अगेन सुरु केले. त्यामध्ये सरकारी आणि खाजगी कार्यालये देखील सुरु झाली. सोबतचं काही व्यवसायांना देखील राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शहरात पुन्हा पहिल्यासारखी गर्दी होत आहे. परिणामी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या मुंबई शहरात 1,75,886 लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्या मुळे संसर्ग साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्यांनी सांगीतले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.