loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा ते सालसे दरम्यान रस्त्यावर खड्डेच खड्डे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

करमाळा ते पांडे -सालसे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचल्याने दुचाकी स्वारांना व तसेच चारचाकी चालकांना खड्डयाचा आंदाज लागत नसल्याने वाहने चालवाताना कसरत करावी लागत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

देवीचा माळ तसेच सोरटे वस्ती, पांडे या ठिकाणी भर रस्तयात भले मोठे खड्डे पडले आहेत तसेच या रस्त्यावर अचानक येणाऱ्या खड्यामुळे तो चुकवण्याच्या नादात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकराता येत नाही. त्या मुळे आशी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ?असा सवाल विचारला जात आहे

तात्काळ खड्डे न बुझवल्यास तिव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.

शंभुराजे फरतडे -

करमाळा सालसे या रस्त्यावरुन हा कुर्डुवाडी मार्गे पंढरपुर व सोलापुर तसेच तुळजापुर ला जाणाऱ्या प्रवाशांमुळे या रस्त्यावर वाहनाची गर्दी आसते त्या मुळे संबधित विभागाने तात्काळ हे चांगल्या प्रकारे खड्डे बुजवावेत आशी नागरीकांतुन मागणी होत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आज पर्यंत या रसत्यावर पडलेल्या खड्यांमुळे अनेक छोटे मोठे आपघात घडले असुन अनेकांना अपंगत्व आले आहे. हे खड्डे न बुझवल्यास भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागे होणार आहे का आसा संतप्त सवाल शिवसेना विभाग प्रमुख संतोष दुधे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts