loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा भाजपाने राबवले विविध उपक्रम

भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने देशाचे पंतप्रधान मा. श्रो.नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा तालुका भाजपाच्या वतिने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .सदर कार्यक्रमांतर्गत खडकी तालुका करमाळा येथे माननीय जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय तालुकाध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम तसेच माजी सैनिकांचा सत्कार असा कार्यक्रम घेण्यात आला तसेच करमाळा कोविड सेंटर येथे सर्व रुग्ण तसेच कर्मचारी यांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रसंगी निवासी नायब तहसीलदार किरवे साहेब, कोविड सेंटरचे डॉक्टर व स्टाफ उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष किरण बोकन, ता. उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,किसान मोर्चा ता.अध्यक्ष विजयकुमार नागवडे, माजी तालुका सरचिटणीस मोहन शिंदे, माजी तालुका उपाध्यक्ष दादासो देवकर, माजी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अजिनाथ सुरवसे, विस्तारक भगवानगिरी गोसावी, जेष्ठ कार्यकर्ते शाम सिंधी,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.अश्विनी भालेराव, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजश्री खाडे तसेच प्रतिष्ठित व्यापारी आसराजी सरवदे आदीजन उपस्थित होते

या वेळी भाजपा कार्यालयात करमाळा शहरातील सर्व माजी सैनिक तसेच या कोरोनाच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करणारे कोविड योद्धा यांना एकत्रित करून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पार पाडला.

शहर प्रतिनिधी /सा करमाळा चौफेर

हे सर्व उपक्रम पार पाडण्यासाठी जयंत काळे पाटील, मनोज मुसळे, गणेश गोसावी, विनोद इंदलकर आदींनी परिश्रम घेतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts