तक्रारदार पुढे न आल्याने आरोपीची हिंमत वाढून तो अधिकाधिक गुन्हे करण्यास कसा सोकावतो, याचा अनुभव अलिकडेच । अटक केलेल्या अल्फाज जमानी या तरुणाबाबत सायबर पोलिसांना येत आहे. अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या २० वर्षांच्या अल्फाजच्या जाळ्यात ७०० मुली सापडल्याचा अंदाज आहे. जमानीला सायबर पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली. वर्षभरापूर्वी त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र मुलींच्या पालकांनी तक्रार देणे टाळल्याने अल्फाज सुटला आणि नंतर त्याने असंख्य मुलींना लक्ष्य केले. अल्फाजच्या मोबाइलमध्ये साठवून ठेवलेली सुमारे ७०० अल्पवयीन मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती पाहून सायबर पोलीसही चक्रावले आहेत.
मुंबईतील तक्रारदार तरुणीव्यतिरिक्त अन्य आठ ते दहा मुलींची ओळख पटली आहे. पालक पुढे आल्यास आरोपीविरोधात भक्कम पुरावे उभी करणे शक्य होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. पुणे पोलिसांच्या तपासात अल्फाजने शोषण केलेल्या आठ ते दहा मुलींची ओळख पटली होती. यातील बहुतांश मुली अल्पवयीन होत्या. मात्र एक १९ वर्षीय तरुणी सोडल्यास अन्य मुलींच्या पालकांनी तक्रार देणे टाळले. काहींनी बदनामी होईल, या भीतीने तपास करू नका, असेही पोलिसांना सांगितले. त्यामुळे अल्फाजविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तुलनेने हलक्या कलमान्वये कारवाई झाली. त्यामुळे तो गामिनावर मुक्त झाला.
या प्रसंगातुन अल्पवयिन युवतींनी ऑनलाइन अॅप म्हणजे फेसबुक ,व्हटसप, इन्स्टा ग्राम वापरताना खबरदारी घेतली पाहिजे.
मुंबई सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी दोन दृष्टीकोनातून अल्फाजबाबत तपास करत आहेत. त्याने छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती. मिळवण्याखेरीज अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत का, याची माहिती सायबर पोलीस घेत आहेत. दुसरीकडे त्याने हे अश्लिल साहित्य पॉर्न संकेतस्थळे चालविणाऱ्या कंपन्यांना विकले आहे का? याचीही खातरजमा पोलीस करत आहेत. त्यासाठी त्याचे बँक व्यवहार तपासत आहेत. ••©गुन्ह्याची पद्धत©•• अल्फाजने तरुणींच्या नावे चार ते पाच इन्स्टाग्राम खाती तयार केली. त्याआधारे त्याने अल्पवयीन मुलींशी मैत्री केली. पुढे त्याने मुलींची छायाचित्रे 'मॉर्फ' करून ती सर्वत्र प्रसारित करण्याची धमकी दिली. धमकीच्या आधारे त्याने मुलींना आक्षेपार्ह कृती करण्यास भाग पाडून त्याची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती मिळवल्या. काही प्रकरणांमध्ये त्याने या मुलींच्या इन्स्टाग्राम खात्यांवरील ताबास्वतःकडे, घेतला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.