loader
Breaking News
Breaking News
Foto

विक्रमदादा शिंदे यांनी केले म्हसेवाडी तलावातील पाण्याचे पुजन, म्हसेवाडी तलावाचा दहिगाव योजनेत समावेश करण्याचा दिला शब्द

मोठा पाऊस झाला नसल्याने म्हसेवाडी तलाव कोरडा ठणठणीत होता. या तलावात चिमणीला पिण्यासाठी देखील पाणी शिल्कक नव्हते. दहीगाव उपसा सिंचन योजने चे पाणी गुळसडी व देवळाली या लढ्यातुन म्हसेवाडी तलावात सोडल्याने या तलावात आता तिस टक्के पाणी साठा झाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

म्हसेवाडी तलावात पाणी आल्याने शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज कमलाई भवानी कारखान्याचे चेअरमन विक्रम दादा शिंदे यांच्या हस्ते पाणी पुजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच तुकाराम शिरसागर, म्हसेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब आडसुळ, नाना आनारसे, बळीराम जाधव, ज्ञानदेव शिरसागर, समाधान भोगे, ज्ञानदेव ननवरे, सम्मद मुजावर, त्रिबक ननवरे मान्य वर उपस्थित होते.

दहीगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी म्हसेवाडी तलावात आल्याने पांडे म्हसेवाडी अर्जुननगर या गावाचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुठणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.- नाना आनारसे (पांडे)

अमजद मुजावर (पांडे) / चौफेर प्रतिनिधी

या विक्राम शिंदे बोलताना म्हणाले म्हसेवाडी तलाव दहिगाव उपसा योजनेच्या आराखड्यात नसताना सुधा शेतकऱ्यांच्या मागणी मुळे आमदार संजय मामा शिंदे यांनी म्हसेवाडी तलाव पाणी सोडले आहे. येणाऱ्या काळात म्हसेवाडी तलावाचा दहिगाव उपसा योजनेच्या आराखड्यात सामावेश करून तलाव पातळी नुसार पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी पांडे, म्हसेवाडी, आर्जुनगर भागातील शेतकरी उपस्थीत होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts