loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा सकल मराठा समाजाच्या वतिने केंद्र व राज्य सरकारचा निषेध!

शेकडो मुक मोर्चे, पन्नास मराठा बांधवाच्या बलिदानानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते नुकत्याच झालेल्या स्पर्धा परिक्षेत आरक्षणाचे फायदे दिसुन आले होते मात्र न्यायालयाने मराठा समाजाच्या स्वप्नांना नख लावल्याने सकल मराठा समाजा मध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुका सकल मराठा समाजाने तहसील कचेरी येथे एकत्र येवुन प्रचंड घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकाराचा निशेध करत आपला रोष व्यक्त केला व तहसीलदार समीर माने यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदन तहसीलदार समीर माने यांनी स्विकारले

शहर प्रतिनिधी /सा करमाळा चौफेर

आपल्या निवेदनपत्रात मग मराठा समाजाच्या खालील मागण्या करण्यात आल्या आहेत १) न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कालपर्यंत झालेल्या सर्व भरती प्रक्रियामध्ये फुलपट्टी लावून न तपासता आलेल्या सर्व जाहिराती याचा आधार धरुन सर्वांना शासकिय सेवेत तात्काळ समावून घेण्यात यावे. २) ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षेचे फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता E.W.S. ओपन करावेत व त्यांना वर्ग श्रेणी बदलण्याचा अधिकार द्यावा. ३) ज्या ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या भरवश्यावर प्रवेश मिळालेला आहे, अॅडमिशन घेतले आहे अश्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने फी मध्ये सवलत द्यावी व इतर आरक्षणाप्रमाणे ५०% फी राज्य सरकारने भरावी. ४) ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत लागू शकत नाही अशांना विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात यावे. ५) तसेच मराठा आरक्षणामध्ये न्यायालयाने दिलेल्या स्थगिती १६/४ प्रमाणे इंदिरा साहनी खटल्याचा दाखला देण्यात आलेला आहे. मराठा आरक्षण हे १५/४ प्रमाणे सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासलेले असल्याने देण्यात आलेले आहे या करिता राज्य सरकारने तात्काळ पाच न्यायमुर्तीच्या खंडपिठाकडे स्थगिती करण्याची मागणी करावी. ६) सारथी संस्थेला भरघोस आर्थिक मदत करण्यात यावी. ७) आण्णासाहेब पाटील महामंडळा मार्फत होण्याऱ्या कर्ज प्रकरणा संर्दबात बँकाना सुचना द्याव्यात.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या सर्व मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.आसा इशारा देण्यात आला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts