loader
Breaking News
Breaking News
Foto

रयत क्रांती संघटनेच्या निवडी जाहिर , जिल्हाध्यक्षपदी गणेश मंगवडे तर तालुका अध्यक्ष पदी शिवशंकर जगदाळे.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत संस्थापक अध्यक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला असुन जिल्हाध्यक्ष पदी गणेश मंगवडे तर करमाळा तालुका अध्यक्ष पदी शिवशंकर जगदाळे यांची निवड करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले व जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील सर रयत क्रांती संघटनेचे विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड कृष्णा सूर्यवंशी राज्य कार्यकारिणी सदस्य छगन पवार हे उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश मंगवडे यांची फेरनियुक्ती करण्यात आली. असुन मार्केट कमिटीचे माजी संचालक शिवशंकर जगदाळे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका उपाध्यक्ष पदी संतोष माने ग्रा.पं. सदस्य कंदर यांची निवड करण्यात आली.

शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचा विश्वास नुतन पदाधिकाऱ्यांनी सा चौफेर शी बोलताना व्यक्त केला

तालुका प्रतीनिधी /सा करमाळा चौफेर

यावेळी राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की रयतक्रांती संघटनेतील कार्यकर्त्यांचे जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतमजूर व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान आहे. आ. सदाभाऊ खोत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे.या निवड प्रसंगी जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील सर म्हणाले येथून पुढील काळात संघटनेमध्ये बरेच कार्यकर्ते काम करण्यास उत्सुक आहेत.भविष्यकाळात सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येतील.यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य छगन पवार विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड कृष्णा सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा जाधव युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार व्यवहारे करकंब माढा तालुका अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड राहुल बाबर बळीराम गायकवाड कुंदन भालेराव भीमराव पवार विराग मांडवकर बार्शी धर्मेश कोठारी गणेश पवार अप्पा थिटे जगदिश मस्के अशोक भानवसे प्रशांत करळे अमोल गवळी महावीर नरसाळे बबन भोसले आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts