loader
Breaking News
Breaking News
Foto

परांडा तालुक्यातील वाळु माफियांचा आवाटी येथीेल सीना नदीपात्रात धुडगुस ! प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

परांडा तालुक्यातील डोमगाव रोसा या परिसरातील वाळुमाफियांचा करमाळा तालुक्यातील आवाटी येथील सीना नदीपात्रात धुडगुस सुरु असुन बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन करण्याचा धंदा राजरोसपणे सुरु आहे.या अवैध प्रकाराला काही स्थानिक छुपे रुस्तुम मदत करत असल्याची चर्चा आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा वाळू लिलाव नसताना शेकडो ब्रास वाळू चोरी होत आहे . वाळूमाफियांनी नदीपात्राची चाळण करून नदीपात्रात जेसीबीच्या साह्याने मोठमोठे खड्डे खोदून मोठ्याप्रमाणात वाळूची चोरी केलेली आहे. वाळू तस्कर इतके मुजोर झाले आहेत की ते दिवसाढवळ्या वाळूचोरी करत आहेत.सर्व गोष्टींकडे पोलिस स्टेशन तसेच महसुल विभाग का दुर्लक्ष करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. या वाळु माफियांना स्थानिक प्रशासनाचे सहकार्य व वरदहस्त तर नाही ना ?आशी जोरदार चर्चा परिसरात आहे. कारण या गोष्टींकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून प्रशासनाकडून वाळू चोरीला अटकाव होण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले जात नाही.

वाळुमाफियांवर कारवाई न झाल्यास तिव्र आदोंलन होण्याची देखील शक्यता आहे

सुनिल तरटे -

दिवसेंदिवस अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. प्रशासनाला हाताशी धरून अवैध वाळू उपसा होत आहे तरी यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे. करमाळा तालुक्यातील आवाटी या गावाच्या हद्दीतून वाळू माफियांचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. अवैध वाळू उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.तसेच नदीची जलधारण क्षमता कमी होत आहे.त्यामुळे नदी पात्रातून होणारी वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, ती जबाबदारी व्यवस्थितपणे का पार पाडली जात नाही याची वरिष्ठांनी गंभीर दखल घ्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

वाळू माफियांनी वाळूचे उत्खनन करताना नदीच्या एका बाजूने जमिनीलगत मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले आहेत त्यामुळे नदीचा प्रवाह त्याच दिशेने पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाले तर नदीकाठच्या जमिनी पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाण्याची शक्यता आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts