loader
Breaking News
Breaking News
Foto

आज पासुन 'करमाळा - मुंबई' जाण्यासाठी 'रातराणी' सज्ज!

राज्य परिवहन करमाळा आगारातुन करमाळा ते मुंबई जाणे- येण्यासाठी'रातराणी' म्हणून प्रसिद्ध असलेली बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा - मुंबई या मार्गावर महामंडळाने विना वातानुकूलित आसनी शयानयान (सीटर कम स्लीपर) ही बससेवा दि.09/09/2020 पासून सुरू केली असल्याची माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे दररोज रात्री सात वाजता ही बस करमाळा येथून सुटेल व पहाटे पाच वाजता मुंबई येथे पोहोचेल. तसेच मुंबईहून ही बस रात्री 9.45 वाजता सुटेल व करमाळा येथे सकाळी 6.30 वाजता पोहोचेल असे ही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे. या बस चा सिटिंग आणि स्लीपर साठीचा तिकीटदर सारखाच आहे.विशेष म्हणजे ही बस रिझर्व्हेशन साठी देखील उपलब्ध आहे.

कोरोनाच्या पार्दुर्भामुळे बस सेवा बंद होती रातराणी सुरु झाल्याने प्रवशांची सोय होणार आहे.

शहर प्रतिनिधी /सा करमाळा चौफेर

तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी केले आह

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये - बसमध्ये ३० पुश बॅक आसने व १५ प्रशस्त शयन (बर्थ) - एलईडी मार्गफलक - चालक कक्षात अनाऊन्सिंग सिस्टीम - प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा - प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग लॅम्प व निळ्या रंगाची नाईट लॅम्प - प्रत्येक शयन कक्षाला एक कोच फॅन -दोन मोठ्या आकाराचे सामान कक्ष -खिडक्यांचा आकार १९०० मिलीमीटर

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts