loader
Breaking News
Breaking News
Foto

पवारांची पॉवरफुल बैठक संपन्न, आता तरी 'आदिनाथ'चा गुंता सुटणार का?

देशाचे नेते व माजी कृषी मंत्री खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज मुबंई येथे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी व मकाई सहकारी साखर कारखान्याचे योग्य नियोजन करुन हे दोन्ही कारखानाने व्यवस्थित सुरु करण्यासाठी आज मुबंई येथे स्पेशल बैठक घेतली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हि बैठक अतिशय पॉवरफुल झाली असुन दोन्ही कारखाने सुरळीत पणे सुरु करण्यासाठी स्वत:पवार साहेब अत्यंत सकारात्मक भूमिका घेत होते व संबधित खात्याचे मंत्री व आधीकारी यांना बारकाईने सुचना करून त्या काठेेकोर पणे राबविण्याचे आदेश देत असल्याचे समजले.

'आदिनाथ 'मकाई जर पुर्ण क्षमतेने सुरु झाले तर शेतकरी, कामगार, वाहतुकदार यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शहर प्रतिनिधी /सा करमाळा चौफेर

विशेष म्हणजे या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील , सहकार आयुक्त शेखर गायकवाड , आदिनाथ च्या संचालिका रश्मी दिदी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, बाजार समितीचे संचालक सुभाष गुळवे, मकाईचे एमडी हरिशचंद्र खाटमोडे उपस्थित होते. दोन्ही कारखान्याचा हंगाम यशस्वीपणे यावर्षी चालण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

'आदिनाथ' व 'मकाई' सहकारी साखर कारखाने अडचणीतुन बाहरे काढण्यासाठी खा व माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी मुंबई येथे पॉवरफुल बैठक घेतली आहे. हे दोन्ही कारखाने वाचवण्यासाठी बागल यांनी 'गोवींद बागेची'साथ सोडत 'मातोश्री' जवळ केली होती.मात्र विधान सभा निवडणुकिनंतर राजकिय 'करामती' करत 'बरामाती' कर सत्तेत आले व सहकारावर त्यांनी पकड मिळवली आहे. पवार यांच्या पॉवरफुल बैठकीनंतर तरी आदिनाथ चा गुंता सुटणार का? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts