loader
Breaking News
Breaking News
Foto

आम्ही मराठा स्मार्ट किड स्पर्धेत हिंदवी राऊत विजयी

- आम्ही मराठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'We Maratha Smart Kid 2020' या स्पर्धेत मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील हिंदवी सुधीर राऊत ही विजेती ठरली आहे. हिंदवीला We Maratha Smart Kid 2020 सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

फेसबुकवर आम्ही मराठा हा मराठ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेला फेसबुक ग्रुप असुन या ग्रुप च्या वतीने 'We Maratha Smart Kid 2020' ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मराठा बांधवांनी आपल्या मुलांचा समावेश करत भरघोस प्रतिसाद नोंदविला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील 103 मुला-मुलींनी सहभाग घेतला. 10-10 जणांची फेरी करून अतिंम दहा जणांची निवड करण्यात आली. त्यातून हिंदवीचा प्रथम क्रमांक आला आहे.

लॉकडावुनच्या काळात ऑनलाइन स्पर्धा घेवून वुई मराठा ग्रुप ने वेगळा आदर्श निर्माण केला असुन नेटकरी याचे कौतुक करत आहेत

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

दरम्यान, अंतिम फेरीतील इतर सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र कुरियरद्वारे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती We Maratha Founder अनिरुद्ध शिवाजी शेलार, सोशल मीडिया प्रमुख सुधीर सोनवणे, महाराष्ट्र राज्य प्रमुख मयूर पाचोरे, सरचिटणीस विशाल बोरसे, राज्य समन्वयक अमित धावडे, महिला विंग प्रमुख स्नेहल कदम पाटील यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts