loader
Breaking News
Breaking News
Foto

युरिया खताचे वितरण वि.का.से.सह.सोसायटी मार्फत व्हावे :- शंभूराजे जगताप

युरिया खत विक्रीतील कृत्रिम टंचाई व अनियमितता रोखण्यासाठी खताची विक्री वि.का.से.सह.सोसायटी मार्फत करावी अशी मागणी जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप यांनी तहसीलदार समीर माने व कृषिअधिकारी सुरज पाटील , यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पिकांच्या पोषणासाठी आवष्यक असणाऱ्या युरिया खताची मागणी सर्वत्र मोठ्या स्वरूपात असल्याने काही दुकानदार या खताची कृत्रिम टंचाई करत असल्याचे निदर्शनास येते ,तसेच युरिया सोबत इतर स्वरूपाची अनावश्यक खते घेण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले जाते

शहर प्रतिनिधी

करमाळा तालूक्यातील 60% क्षेत्र हे जिरायती स्वरूपाचे असून हंगामी व खरीपाची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात त्यामुळे युरिया शिवाय इतर खते या शेतकऱ्यांना अनावश्यक आहेत.तसेच काही दुकानदार शेतकऱ्यांना तुम्ही आमचे नेहमीचे ग्राहक नाहीत...मागील बाकी जमा केल्याशिवाय युरिया मिळणार नाही,तसेच युरिया खत जास्त भावाने विकने असे प्रकार घडत आहेत. या गैर प्रकाराकडे गरजेपोटी शेतकरी बांधव दुर्लक्ष करित आहेत,तरी या खताचे वाटप गाव पातळीवरील विविध कार्यकारी सह.सोसायट्यांमार्फत वितरीत केले तर सर्व शेतकऱ्यांना सोसायटीकडे असणाऱ्या दफ्तरी रेकॉर्ड प्रमाणे क्षेत्रानुसार योग्यरितीने वितरित होईल व खत दुकानदारांच्या नफेखोरी व कृत्रिम टंचाई ला चाप बसेल असे निवेदनात नमुद केेले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शेतकऱ्यांना दरवेळेसच्या युरियाच्या खताच्या कृत्रिम टंचाईच्या फेऱ्यातुन मुक्त करण्यासाठी जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप यांनी हि मह्तवपुर्ण मागणी केली आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts