loader
Breaking News
Breaking News
Foto

'दारुची 'दुकाने उघडता मग 'मंदिरे' बंद का ? गणेश चिवटे

दारुची दुकाने उघडता मग महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिराची दारे खुले करण्यासाठी तसेच कुंभकर्णासारख्या गाढ झोपेत असलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्याकरिता 'दार उघड उध्दवा दार उघड 'या घोषणेने करमाळासह राज्यभर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.या वेळी 'दारुची' दुकाने उघडता मग 'मंदिरं 'बंद का ?असा सवाल भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदर आंदोलन भाजपा तालुकाअध्यक्ष गणेश चिवटे, तालुकासरचिटणीस सुहास घोलप, तालुकाउपाध्यक्ष रामा ढाणे, जिल्हाउपाध्यक्ष किरण बोकन, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, विस्तारक भगवान गिरीगोसावी, ओबीसीअध्यक्ष धर्मराज नाळे, किसान मोर्चा अध्यक्ष विजय नागवडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, प्रदीप ढेरे महाराज, विलास जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले.

करमाळा शहरातील बंद असलेल्या दत्त मंदिर समोर हे आंदोलन करण्यात आले.

शहर प्रतिनिधी .

आंदोलनावेळी भाजपाचे मोहन शिंदे, डॉ. अभिजीत मुरूमकर, उदय भालेराव, काळे महाराज, मस्तान कुरेशी, बाळासो कुंभार, धनु किरवे, दीपक सवालके, अक्षय शिंदे, लक्ष्मण काळे, जयंत काळे, चेतन राखुंडे, पुष्पक ढेरे, राजू गुंड, दादा झाडबुके, नागेश गुरव, बाप्पू मोरे, राजेश ठोंबरे आदी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

घंटानाद करून निद्रिस्त ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच राज्यातील सर्व मंदिराची व मस्जिदिची दारे खुले करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदन तहसीलचे निवासी नायब तहसीलदार बदे यांनी स्वीकारले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts