सिमाभागातील - पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कित्तुर साम्राज्य चे सेनापती संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुर्वी शिवाजी महाराज चौक नाव बदलण्याची क्ननड संघटनांनी मागणी केली आहे. त्यासाठी येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले असून, त्यांनी रायन्ना यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवला आहे. हा पुतळा इतरत्र हलवण्याची मागणी मराठी भाषिकांनी केली आहे. संगोळी रायन्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. काही कन्नड संघटनांनी रात्री ३ वाजता यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पिरणवाडी गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात केला आहे. या आधीही कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांनी रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने वाद उद्भवला होतात्यानंतर पोलिसांनी येथील आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा केलेला. येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी वाल्मिकी या महापुरुषांचे समान उंचीचे पुतळे उभारण्याचा ठराव मनगुत्ती ग्रामपंचायतीने केला होता.गावातील काही तरुणांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला होता. पण एका गटाने त्यास विरोध करत पुतळा काढण्यासाठी दबाव सुरु केला. राज्य सरकारच्या आदेशानंतर हा पुतळा हटवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणानंतर देशभरातील शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.
बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी गावातील मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेला अन्यायकारक हल्ला प्रकरण सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथजी शिंदे यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत मंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बी.एस. येडीयुरप्पा यांस खरमरीत पत्र लिहले असुन वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत असुन मराठी भाषक विरुद्ध कन्नड भाषक वाद निर्माण होऊ देऊ नका असे सुनावले आहे .यापूर्वीच मनगुत्ती घटनेवरून महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत पिरणवाडी - मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्या कन्नड संघटनावर योग्य कार्यवाही करा आशी मागणी शिंदे यांनी केली आहे .
तसेच महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहले. तर सीमाभागाचे समनव्ययक मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र पाठवून घडलेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केलेला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.