loader
Breaking News
Breaking News
Foto

दहीगाव च्या पाण्याने म्हसेवाडी तलाव भरुण द्या -शाहुदादा फरतडे

पांडे ,अर्जुनगर व म्हसेवाडी या तिन गावांच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याची सोय करणाऱ्या म्हसेवाडी तलावात दहिगाव उपसा सिंचन योजनेतुन पाणी सोडावे आशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुदादा फरतडे यांनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निम्मा पावसाळा संपला तरी करमाळा तालुक्यातील पुर्व भागात आद्याप मोठा पाउस झाला नसल्याने या भागातील ओढ्या नाल्यांना पाणी आले नाही त्यामुळे म्हसेवाडी तलावात पाणी साठा झाला नाही, परिणामी परिसरातील विहीर बोर च्या पाण्याची पातळी ऐन पावसाळ्यात घटत चालली आहे.

गेल्या वर्षी म्हसेवाडी तलावात दहिगावचे पाणी पोहचण्या आगोदर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. सध्या पाऊस कमी असल्याने तलाव कोरडा ठाक आहे.

पांडे प्रतिनिधी -अमजद मुजावर .

सध्या पांडे व पंचक्रोशीतील खरिप हंगामाची पिके समाधानकारक असली तरी दमदार पाऊस नसल्याने रब्बी हंगामावर टांगती तलवार आहे. दुर्दैवाने मोठ पाऊस न झाल्यास या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. त्या मूळे ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सध्या उजनी ची पाणी पातळी वाढत असल्याने तात्काळ दहिगाव योजना सुरु करुन म्हसेवाडी तलाव भरुन द्यावा आशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुदादा फरतडे पत्रकार दस्तगीर मुजावर, सुनिल भोसले, विकास भोसले, उपसरपंच गहिनीनाथ दुधे, मनोज पाटील, जगन्नाथ कोल्हे, बळीराम आवसारे; दिपक ननावरे, भाऊसाहेब आडसुळ आदींनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सध्या उजनी धरणात झपाट्याने पाणीसाठा होत असुन दहिगाव उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी हलचाली सुरु आहेत.गेल्या वर्षी म्हसेवाडी तलावात पाणी सोडण्याच्या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने हा तलाव कोरडा पडला आहे. या तलावावर तिन गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts