कोरोनाजन्य परिस्थितीत माथाडी कामगारांना आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार कामगार मंत्री श्री दिलीप वळसे-पाटील महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते डॉ. श्री बाबा आढाव, यांचे करमाळा तालुका हमाल पंचायत चे अध्यक्ष अॅड राहुल सावंत यांनी आभार मानले आहेत.
आपल्या आभार पत्रात सावंत यांनी म्हटले आहे की कोरोना संसर्ग कोविड (19) रोखण्यासाठी संपूर्ण देश व राज्यभर लॉकडाऊन पुकारण्यात आले होते.त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते,या लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका गरीब कष्टकरी व हातावरचे पोट असणाऱ्या माथाडी कामगारांना बसला.या काळात हाताला कुठलेही काम नसल्यामुळे कामगारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्कील होऊन उपासमारीची वेळ आली होती,
माथाडी कामगारांच्या या महत्व पुर्ण मागणीचा शासनाने सहानभुती पुर्वक विचार करुन न्याय दिल्याने शरदचंद्र पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामगार मंत्री दिलिप वळसे -पाटिल यांचे आम्ही आभार मानत आहोत तसेच या प्रश्नावर विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्याबद्ल आमदार संजयमामा शिंदे व हमाल पंचायतचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी शिंदे यांचे देखील आभारी आहोत.- अॅड राहुल सावंत (अध्यक्ष हमाल पंचायत, सदस्य करमाळा पंचायत समिती)
यासाठी माथाडी कामगारांना शासनाकडून आर्थिक मदतीची आवश्यकता भासत होती.ही मदत मिळवून देणेसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी राज्य शासनास पत्र व्यव्हार करून पाठपुरावा केला व आर्थिक मदतीची मागणी केली.तसेच संबंधित मंत्र्यासोबत बैठक घेऊन कोरोना काळात माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण देण्यासाठी व माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत दाखल करून घेणेसाठी प्रयत्न केले त्यांच्या या म्हत्वपुर्ण मागणीचा देशाचे नेते शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानभुतीपुर्वक विचार करुन बाजार समिती मधील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आर्थिक सहाय्य रु 3000 त्यांच्या बँक खात्यावर जमा केले व माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत दाखल करून घेतले. कामगारंच्या न्याय मागणीची सरकारने दखल घेतल्या बद्दल समस्त कामगार बांधावनी सरकारचे कौतुक केले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.