loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमहाराष्ट्र केसरी पैअतुल भाऊ पाटील यांच्या "विजयी आरोळीवर" बेळगावातील गणेश मंडळाचा देखावा !

करमाळा तालुक्यातील लव्हे सारख्या छोट्याशा खेडेगावातुन संघर्षाच्या व मेहनतीच्या जोरावर दोनवेळा उप महाराष्ट्र केसरी व क्रिडा क्षेत्रात मानाचा समजला जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घालणारे पै अतुल भाऊ पाटील यांच्या कुस्ती जिंकल्यावर केलेल्या विजयी आरोळीवर सिमाभागातील बेळगावातील कामन्ना युवक मंडळाने नयनरम्य देखावा साकार केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या देखाव्याचा फोटो व अतुल पाटील यांच्या विजयी आरोळी क्षणाचा फोटो आज दिवसभर सोशेल मिडियावर व्हायरल होत असुन कुस्ती प्रेमींचा व पैलवान मंडळींचा हा देखावा पाहुन अभिमानाने उर भरुन येत आहे.

देखावा पाहुन मन भरुण आले. व जुण्या आठवणी ताज्या झाल्या. कामन्ना मंडळाने हा देखावा सादर करुन तमाम पैलवान मंडळीचा सन्मान केला आहे. अतुलभाऊ पाटील (डबल उप महाराष्ट्र केसरी तथा पंचायत समिति सदस्य करमाळा)

तालुका प्रतीनिधी/ सा करमाळा चौफेर

अतुल भाऊ पाटील यांना बालपणापासुनच कुस्तीचे बाळकडू मिळाले आहे. स्व गोविंद बापु पाटील, माजी आमदार नारायण आबा पाटिल यांच्या कडुन त्यांनी पैलवान होण्याची प्रेरणा घेतली होती.२००७ साली ते पहिल्यांदा उप महाराष्ट्र केसरी झाले होते व नंतर २०११ साली त्यांनी पुन्हा उपमहाराष्ट्र केसरी पदाला गवसणी घातली होती. २००६ /७ साली त्यांना मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts