loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखलठाणमध्ये ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम संपन्न.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव येथील कृषीदूत तुषार दादासाहेब सरडे यांच्याकडून चिखलठाण या गावात विविध प्रात्यक्षिक तसेच चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम सण 2020-21 अंतर्गत हे कृषीदुत कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 या रुग्णाच्या प्रादुर्भावामुळे सदर कार्यक्रम शासनाचे सर्व नियम पाळून चिखलठाण मध्ये घेण्यात आला . यामध्ये कृषीसल्ला, चर्चासत्र, विविध पिक, प्रात्यक्षिक, सर्व जनावरांचे लसीकरण व माती परीक्षण शिबिर तसेच कृषी विषयक इतर उपक्रम राबविण्यात आले.

तालुका प्रतिनिधी सा चौफेर

सदर विद्यार्थी श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरि हाके , कार्यक्रम समन्वयक कार्यक्रम अधिकारी प्रा. धीरज दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेत आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

. सदर विद्यार्थ्यांना श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश (बापू) पाटील, सचिव सौ. श्रीलेखा पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वनवे, दिनेश आप्पा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी चिखलठाण गावचे सरपंच व उपसरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts