loader
Breaking News
Breaking News
Foto

सबस्टेशन होईपर्यंत राजुरीसाठी स्वतंत्र फिडर द्या-तृप्ती साखरे

राजुरी गावातील विजेचा वाढता वापर तसेच ओलिताखाली येणारे वाढलेले बागायती क्षेत्र वाढले आहे परिणामी पारेवाडी आणि कोर्टी या सबस्टेशन वरून मिळणारी वीज कमी दाबाने तसेच अनियमित येत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या साठी एस.सी.बी.करमाळा चे उप अभियंता श्री.जाधव साहेब यांच्या कडे गावात स्वतंत्र 5 के.व्ही. क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यासंबंधी मागणी करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तसेच वरील मागणीचा पाठ पुरावा होई पर्यंत कोर्टी सबस्टेशन वर अतिरिक्त फिडर बसवुण राजुरी गावातील शेतीपंपा साठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न तात्काळ सोडवावा आशी म्हत्वपुर्ण मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा तृप्तीताई साखरे यांनी पालकमंत्र्याकडे निवेदना द्वारे केली आहे या वेळी युवा नेते श्रिकांत साखरे उपस्थित होते

सबस्टेशनचा प्रस्ताव तयार असून सध्या तात्काळ सबस्टेशन उभारणे शक्य नसले तरी कोर्टी किंवा पारेवाडी सबस्टेशन वर स्वतंत्र फिडर बसवला तर शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे याबाबत लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पालकमंत्री दत्तामामा भरणे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल तृप्तीताई साखरे -सरोदे .

तालुका प्रतिनिधी सा चौफेर .

सदर प्रस्तावासोबत तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे ,पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचे शिफारस पत्र व ग्रामपंचायत ठराव जोडण्यात आला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सध्या राजुरी गावातील शेतकऱ्यांना अपुऱ्या विज पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts