loader
Breaking News
Breaking News
Foto

नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा सत्कार

करमाळा नगरपरीषदेने नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी पुढाकार घेवून स्वच्छते विषयक केलेल्या विवीध उपक्रमांच्या जोरावर जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावून तब्बल ५कोटी रू. चे बक्षिस मिळवले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा २०२० मध्ये ' क ' वर्ग नगरपरीषदांमध्ये सोलापूर जिल्ह्यातुन करमाळा नगरपरीषदेचा प्रथम क्रमांक, महाराष्ट्र राज्यात २२ वा तर पश्चिम भारत झोन मध्ये २९ वा क्रमांक पटकावून नगर परिषदेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याकामी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी प्रसंगी टिकाव -फावडे हातात घेवून, नगरपालिकेच्या नगरसेवक व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून स्वतःला झोकून देत शहर स्वच्छतेचे काम केले. स्वतःची 'स्वच्छतादूत ' म्हणुन ओळख निर्माण केली.. त्यांच्या या उल्लेखनिय कामगीरी बद्दल व यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. . करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विदयालयात प्राचार्य कापले पी.ए. यांच्या हस्ते नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आला. यावेळी प्रा.भागडे डी.बी. यांनी प्रास्ताविक केले व प्राचार्य पी.ए कापले यांनी मनोगत व्यक्त केले. हा जिल्ह्यात मिळालेला बहुमान वाढदिवसासाठी खुप मोठी गिफ्ट आहे असे ते म्हणाले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्कारास उत्तर देताना नगराध्यक्ष वैभव राजे जगताप म्हणाले की, जगताप गटाचे नेते मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी वीणा पवार व माझे सर्व सहकारी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी , सफाई कर्मचारी व विशेष करून सर्व करमाळा शहरवासीयांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या योगदानामुळे नगरपरीषद हे यश प्राप्त करू शकली. या यशामागे आमची टीम वर्क ची मेहनत आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धे मध्ये बक्षिस मिळावं म्हणून कामं केली नव्हती,विवीध उपाययोजना करणं माझं कर्तव्य होतं,या यशामुळे माझी जबाबदारी निश्चीतपणे वाढलेली आहे. आपण केलेल्या सन्मानाचा आनंद वाटतो .

शहर प्रतिनिधी /सा करमाळा चौफेर

यावेळी प्राचार्य कापले पी.ए., उपप्राचार्या सौ. सिमा कुंभार, पर्यवेक्षक चनबसप्पा हुनसिमरद, पर्यवेक्षक सतिश शिंदे, विज्ञान शाखा विभाग प्रमुख बाळकृष्ण पाटील, सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा नगर परिषदेला जिल्हयात प्रथम येण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा महात्मा गांधी शैक्षणिक संकुलाच्या वतीने हस्ते सत्कार करण्यात आला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts