करमाळा ता .जेऊर येथील ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक तालमीच्या जागेवर सुरु असलेल्या बांधकामावर तक्रार देवुनही दुर्लक्ष करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनिकरणासाठी लाखो रुपये खर्चुन सुद्धा ग्रामपंचयतीचा कारभार भाड्याच्या गाळ्यात चालतो तो बंद करावा ,निलंबित केलेल्या ग्रामसेवकास परत त्याच ठिकाणी घेवु नये या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने थेट गटविकास अधीकारी यांचे निलंबन करावे या मागणी साठी चार ऑगस्ट पासुन कार्यालयीन वेळेत गटविकास अधीकारी यांच्या दालना समोर धरणे आंदोलन सुरु आहे.जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब करचे, देवानंद पाटिल, बालाजी चंद्रकांत गावडे, यांच्या नेतृत्वाखाली ४ऑगस्ट पासुन हे आंदोलन सुरु असुन
चोविस दिवस उलटुनही आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलन कर्त्यांनी २४ ऑगस्ट पासुन मागण्या मान्य होई पर्यंत कार्यालयीन वेळेत हालगीनाद आंदोलनाचा इशारा दिला होता. सदरचे निवेदन पंचायत समिती व पोलिस स्टेशन यांना दिले होते. मात्र आम्हाला कोणतेही आश्वासन न दिल्याने आंदोलन करावे लागल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे . आज सकाळी निवेदनातील इशाऱ्या नुसार हालगीनाद आंदोलन सुरु करताच पंचायत समिती च्या वतीने पोलिस स्टेशन कडे तक्रारी अर्ज देवुन पोलीसांची कुमक मागवण्यात आली व बालाजी गावडे व देवानंद पाटिल या दोन आंदोलनकर्त्यांना सकाळ पासुन पोलिस स्टेशनला बसवुन ठेवले गेले .हाती आलेल्या माहितीनुसार पंचायत समिति कर्मचारी संघटना व आधीकारी कामबंद आंदोलानाच्या पावित्र्यात असल्याचे समजते. जेऊर येथील ग्रामपंचायत जागेत झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा दोन वर्षा पासुन गाजत आहे. या विषयी च्या तक्रारी नंतर ग्रामसेवक यांचे निलंबन झाले होते. विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायत ची संपूर्ण बॉडी बरखास्तीची कारवाई केली होती. सद्या विभागीय आयुक्तांच्या कारवाईवर हरकत घेवुन ग्रामपंचायती चे सरपंच व सदस्य यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे. मात्र निलंबित झालेल्या ग्रामसेवकाची पुन्हा जेऊर येथे नियुक्ती करण्यात आली आहे व अतिक्रमण जागेवरील बांधकाम सुरु असल्याने आंदोलन कर्त्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. जेऊर ग्रामपंचायतीवर व करमाळा पंचायत समिति वर देखील माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाची एकहाती सत्ता असल्याने या आंदोलनाच्या प्रत्येक घडामोडीवर विरोधी गटा सह तालुक्याचे लक्ष आहे.त्या मुळे या मुद्याला राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करुन आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हाला पंचायत समिती विरोधात टोकाचे पाऊल उचलावे लागेल.-देवानंद पाटिल आंदोलनकर्ते
आंदोलन कर्त्यांच्या मागण्याचे निवेदन आल्यानंतर आंदोलन कर्त्यांच्या सर्व मागण्या व कार्यालयाचे आवहाल वेळोवेळी वरिष्ठ विभागाला सादर केले आहेत.तसेच अनेक वेळा आंदोलकर्त्यांना माजी बाजू व अधिकार समजुन सांगीतले आहेत .त्या मुळे माझ्या स्तरावरील सर्व जबाबदारी मी पार पाडली आहे. लोकशाही नुसार प्रत्येकाला आंदोलनाचा हक्क आहे, परंतु कार्यालयीन वेळेत दालना समोर हालगीनाद सुरु केल्यास पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरीकांच्या कामात आडथळा येत असल्याने पोलिसांना सांगुन हालगीनाद करण्यापासुन रोखले आहे. कोणावरही गुन्हा दाखल करण्याचा वा आंदोलन दडपण्याचा आमचा हेतु नसुन कोणत्याही चौकशीला आम्ही तयार आहोत असे गटविकास अधीकारी श्रिकांत खरात यांनी सा करमाळा चौफेरशी बोलताना सांगीतले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.