loader
Breaking News

करमाळा चौफेर

राजकारण

राजकारण

शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील भाजपाच्या वाटेवर?दोन दिवसापूर्वी केले होते एकनाथ शिंदे यांचे समर्थन !

2022-06-29 00:00:00

दुसरीकडे शिंदे गटात गेलो तर पुन्हा तानाजी सावंत यांचा अडसर नको अशी देखील भावना पाटील समर्थकांची असल्याने पाटील यांनी शिंदे ऐवजी फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारून मोहिते-पाटील यांचा वरदहस्त देखील कायम ठेवण्यात यश मिळवल्याची चर्चा आहे.दरम्यान चौफेर च्या प्रतिनिधीकडुन पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवु शकला नाही.

राजकारण

संतोष वारे पुन्हा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष! मांढरे यांना डच्चु तर आमदार शिंदे यांना देखील धक्का!

2022-06-29 00:00:00

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतोष वारे यांना पुन्हा तालुकाध्यक्ष केले असल्याने मांढरे यांची पुढील भुमिका काय असणार याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राजकारण

संतोष वारे पुन्हा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष! मांढरे यांना डच्चु तर आमदार शिंदे यांना देखील धक्का

2022-06-29 00:00:00

दोन अडीच महिन्यापूर्वी निवड झाल्यानंतर नव्या जोमाने कामाला लागलेले तालुकाध्यक्ष हणुमंत मांढरे पाटील हे आत्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्णयावर काय भुमिका घेतात या कडे राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राजकारण

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा पुढाकार, तहसीलदार यांना भेटुन देणार निवेदन

2022-06-18 00:00:00

या निवेदनात आमच्या काही मागणी वजा सुचनांचा समावेश असून सदर निवेदनातील बाबी मा तहसिलदार यांना भेटुन सांगण्यात येतील व यावर चर्चाही केली जाणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर सोमवार दि 20 जून रोजीच्या या नियोजीत भेटीबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी माहिती देताना सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक शिष्टमंडळ माननीय तहसिलदार यांना निवेदन सादर करणार असून या शिष्टमंडळात करमाळा मतदार संघातील ओबीसी समाजातील आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी ठिक 1 वाजता करमाळा येथील श्री दत्त मंदिरासमोर सर्व निमंत्रितांनी एकत्र येऊन येथून करमाळा तहसिल कार्यालयाकडे जाण्याचे नियोजन आहे. माननिय तहसिलदार यांना भेटण्यापुर्वी श्री दत्त मंदिरात सर्वासमक्ष निवेदनाचे वाचन होणार असून यातील सुचनांवर विचार विनीमय होणार आहे.या शिष्टमंडळात ओबीसी प्रवर्गात मोडल्या जाणाऱ्या सर्व जातीचे प्रतिनीधी असणार आहेत.तरी सोमवारी ओबीसी समाजातील राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, सहकार, क्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापार व उद्योग तसेच महिला व युवक आदि क्षेत्रातील जाणकार नागरिकांनींही सहभागी होऊन या निवेदनास जनमान्यता द्यावी असे आवाहनही यावेळी पाटील गटाकडून करण्यात आले.

राजकारण

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे H.S.C. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

2022-06-08 00:00:00

राजकारण

ब्रिटीश अधिकारी ज्याप्रमाणे अंगावरील कोट दररोज बदलतात त्याप्रमाणे काही मंडळी गट बदलला की आपली भुमिका बदलतात! तळेकर यांचा विघ्ने यांना टोला .

2022-06-08 00:00:00

तळेकर यांनी विघ्ने यांच्यावर केलेल्या खरपूस टिकेनंतर विघ्ने काय उत्तर देतात या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राजकारण

आगामी निवडणूका व प्रचाराचे मुद्दे -✍सूनील तळेकर (राजकीय विश्लेषक

2022-06-07 00:00:00

आमदार शिंदे गटास मात्र विषय आदिनाथ कडे वळाल्याचा फायदा अधिक होऊ शकतो.आज आदिनाथच्या मुळ मतदार सभासदांकडे केवळ आदिनाथचेच शेअर्स आहेत असे नसुन एका एका ऊस उत्पादकांकडे जवळपास दहा ते पंधरा इतर साखर कारखान्यांचेही शेअर्स आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस घालवण्यासाठी आजवर (यंदाचा अपवाद वगळता) पर्याय असल्याने बागल गटावरील सभासद मतदारांचा राग पहिल्या इतका नसणार आहे. केवळ राजकीय वापरासाठी आदिनाथचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत येतो हे आता सभासदही जाणून आहेत. या शिवाय बागल गटाने कारखाना संकटाच्या खाईत ढकलला अशा आरोपाची शिक्षा सभासदांनी बागल गटास जि. प निवडणूक (२०१७-१८) व विधानसभा निवडणुक (२०१९) यामध्ये दिलीच आहे.परत परत त्याच मुद्दयावर प्रचार करणे हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये तरी विरोधकांच्याच अंगलट येऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू योग्य मांडणी असल्यास याची झळ बागल गटास बसू शकते.आदिनाथ कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जेंव्हा लागेल तेंव्हा त्या निवडणूकीत मात्र बागल गटास या मुद्यावर विरोधक घेरतीलही आणि बागल गटास सभासदांचीही साथ मिळणे अवघड जाईल हे वास्तव असेल. आदिनाथ बद्दल सहानभुती असलेला सभासद शेतकरी आता आपल्या ऊस पिकास व्यापारी नजरेतुन पहात गाळपासाठी भरपुर पर्याय हाती असल्याने आदिनाथकडे जरा दुर्लक्षित पणाच करत असावा ही बाब नुकत्याच झालेल्या आदिनाथ कारखान्याच्या आॅनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सहभागातून दिसून येते. जरी ऊस उत्पादक शेतकरी आॅनलाईन सभा सहभागासाठी मोबाईल वापरात पारंगत नसेलही परंतू प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी सुशिक्षीत मुलं मूली आहेत की जे गुगल, अॅनराईड मोबाईल वापर, आॅनलाईन खरेदी-विक्री, आॅनलाईन सभा काॅन्फरन्स आदिबद्दल अगदी पारंगत अशीच आहेत. सभासद शेतकरी आदिनाथच्या वास्तवाबाबत जागरुक व दृढ इच्छा बाळगून असता तर कशाही प्रकारे आॅनलाईन सभेची लिंक क्लिक करुन यात सहभागी झाला असता. या सर्व बाबींचा विचार करता वरकरणी जरी आदिनाथचा मुद्दा प्रचारात आला तरी तो मतदारांना प्रभावी करुन एकुण निकालावर परिणाम करण्याची शक्यता अजिबात नसेल. आता विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी गेल्या दोन अडीच वर्षात केलेल्या विकासकामांचा मुद्दा निवडणूकीवर परिणाम करु शकतो. परत या मुद्यावर विरोधक कशी मांडणी करतात व आमदार शिंदे हे विरोधकांचे मुद्दे कसे खोडून काढतात यावरच या मुद्द्याचा मतदारांवरील परिणाम अवलंबून आहे. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचा आदेश, वीज बिल वसुली, दहिगाव उपसा सिंचन योजना आवर्तनातील पाण्यापासुन वंचीत घटक या बाबी आमदार संजयमामा शिंदे यांना प्रचारकाळात डोकेदुखी ठरु शकतील. तर पाटील गटातून गट सोडून गेलेले कार्यकर्ते हि थोडीफार प्रमाणात माजी आमदार नारायण पाटील यांच्या डोकेदुखीचे कारण होऊ शकेल. याशिवाय कोरोना काळ, लसीकरण,उजनी पाणी नियोजन व पुनर्वसन , दहिगाव उपसा सिंचन योजना कामे व आवर्तने, वीज कपात व भारनियमन, रस्ते, आरोग्यकेंद्र, कुकडी आवर्तन, सीना कोळगाव प्रश्न आदि मुद्दे विधानसभा निवडणुकीत जसे प्रचारात आले तसेच याही निवडणूकीत प्रचारात असतील पण ज्या त्या भागात याचा परिणाम असणार आहे. यातील काही मुद्दे सर्वदुर परिणाम करतील. करमाळा तालूका हा गटातटाचा बाज असलेला तालूका असल्याने गटातील बेरीज व वजाबाकी यावरही प्रचारात काही सभांमधून चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण (आबा) पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी (दिदी) बागल यांच्या कामकाज पद्धतीवरही भाषणे होऊन कदाचित अनेक मुद्दे हाती असताना ही निवडणूक व्यक्तीपातळीवर जाऊ शकते. कदाचित म्हणूनच या निवडणूकीस मिनी विधानसभा निवडणूक म्हटले जाते.पक्षीय राजकारणाचा वा राज्य सरकारच्या कामकाज व निर्णयाचा मुद्दा प्रचारात येऊ शकेल. पण जर कोणत्या तरी राजकीय पक्षाचे बी फाॅर्म भरुन अधिकृतपणे जर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असतील तर त्यांनाच राज्याच्या राजकीय स्थितीचा थोडाफार परिणाम होताना आढळेल. अन्यथा युत्या व आघाडीचे आणि निव्वळ गटबाजीचे राजकारण व उमेदवार रिंगणात असतील तर मात्र हि निवडणूक स्थानिक मुद्दयावर अधिक भर दिलेली असेल. अशारितीने वरील मुद्दे आगामी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी गाजणार हे जरी खरे असले तरी ज्या गटाकडे भक्कम प्रचार यंत्रणा, सोशल मेडीयाचे मोठे व दाट जाळे (नेटवर्क) आणि चांगल्या वक्तृत्व करणार्‍या मुलूख मैदानी तोफा (फर्डे वक्ते) असतील तोच गट मतदारांवर जादा परिणाम करु शकेल. - ✍सुनिल तळेकर - (राजकीय विश्लेषक)

राजकारण

जलधारा अभिषेकातुन कृष्णा भिमा स्थिरीकरणाचा एल्गार! नारायण पाटील गटाकडून अभिषेकाची जोरदार तयारी

2022-06-05 00:00:00

लाकडी निंबोडी योजनेला विरोध करुन माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार शिंदे यांची कोंडी तर केलीच आहे मात्र मोहिते-पाटील यांच्या कृष्णाभिमा स्थिरीकरण योजनेचे समर्थन करुन पाटील गट मोहिते-पाटील गटाच्या मैत्रीचा दोर देखील अधिक मजबूत केला आहे. मोहिते-पाटील व बागल यांची जवळीक वाढत असताना पाटील यांनी लावलेला कृष्णाभिमा योजनेचा मास्टर स्ट्रोक बागलांना देखील कोड्यात टाकणारा ठरणार आहे. एकंदरीत उजनी पाणी परिषद व जलधारा अभिषेकातुन कृष्णा भिमा स्थिरीकरणाचा एल्गार नारायण पाटील गटास बळ देणारा ठरणार अशीच चर्चा सध्या तरी सुरु आहे

राजकारण

खिसा कापला गेलाय,भामटा लक्षात ठेवा शिवसेना माजी आमदाराची राष्ट्रवादीच्या आमदारावर नाव न घेता टिका!

2022-05-30 00:00:00

यावेळी सभापती अतूल पाटील, मा सभापती गहिनीनाथ ननवरे, आदिनाथचे माजी संचालक धूळाभाऊ कोकरे, नवनाथबापू झोळ, मा उपसभापती दत्ता सरडे, जि प सदस्य बिभीषण आवटे, बाजार समिती संचालक बापूराव रणसिंग,यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य जयप्रकाश बिले,प्रा अर्जुन सरक, पत्रकार तालूका संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, बहूजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम,मा सरपंच हनूमंत सरडे, महादेव पोरे, डाॅ कानगुडे, मच्छिंद्र सरडे, दिनकर सरडे, रावसो नेमाणे, मा सरपंच बाळासौ गुंड (शेटफळ), शहाबुद्दीन सय्यद, इन्नुसभाई शेख, गणेश जाधव, पत्रकार नासीर कबीर, बाळासो लबडे, सौमनाथ घाडगे, नवनाथ अवघडे, मारकड सर, स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील, भीमराव घाडगे, शामराव गव्हाणे, सुखदेव नेमाणे, ज्ञानदेव मारकड-पाटील, भीमराव गव्हाणे,वजीर शेख, ज्ञानदेव भगत, उपसरपंच आनंद नाईकनवरे (शेटफळ), चेअरमन भाऊ साबळे, अजिनाथ कळसाईत, सागर पोरे, अॅड विजय कोकरे, विशाल तकुक, दत्तू सरडे, चंदू सुरवसे, ज्ञानदेव चोरमले, सुभेदार पाटील, शिवाजी पाटील, पपू पोळ, विठ्ठल नेमाणे, बापुराव नेमाणे, सुरज बोराडे, बिभीषण गुंड, रंगाशेठ पवार आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन युवानेते सागर पोरे यांनी केले तर आभार उद्योजक रावसाहेब नेमाणे यांनी मानले. या उजनी परिषदेत कुगाव, चिखलठाण २,१ तसेच शेटफळ व केडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

करमाळा चौफेर | दबलेल्या व दाबलेल्या आवाजाला मोकळी वाट करून देणारे वृत्तपत्र

करमाळा चौफेर
http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/ad_1248x100.jpg

व्हिडीओ

करमाळा चौफेर
http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/ad_1248x100.jpg